शहादा । शहादा- डहाणू बसला अनरज गावाजवळ समोरून येणार्या वाळूच्या डंपरने बसला जोरदार धडक दिली. या आपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र बसच्या पुढील चालकाकडील भाग पुर्णपणे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहादा येथून सकाळी 7.15 वाजता निघालेली बस शहादा-डहाणू (क्रमांक एमएच 20 2448) ही डहाणूकडे रवाना झाल्यानंतर रस्त्यावर असलेल्या अनरज गावाजवळ आल्यानंतर समोरून भरधाव येणार्या वाळूने भरलेल्या डंपरने बसला जोरदार धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर बससमोरील भाग पुर्णपणे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक अर्धातास खोळंबली होती.