डंपरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

0

पुणे– भरधाव वेगातील डम्परने जोराची धडक दिल्याने वृध्द सायकलस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (26 फेब्रुवारी) दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी पुणे सातारा रस्त्यावर अहिल्यादेवी चौकात झाला.या अपघातात गणपत बापु खंडागळे (वय-62 रा.पद्मावती) यांचा मृत्यू झाला आहे. डंपरचालक सुधाकर आडे (वय-37) याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गणपत खंडाळे हे सायकलने अहिल्यादेवी चौकातून जात असताना सुधाकर आडे याने वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात डंपर चालवून त्यांच्या सायकलला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने गणपत खंडाळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक सुधाकर आडे हा घटनास्थळी न थांबता पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक ए.बी.गायकवाड अधिक तपास करीत आहेत.