साकेगाव : साकेगाव येथील डंपर क्र. एमएच 43 ई 5132 सावदा येथे येत असतांना अकलूद पंपाजवळ अॅपे रिक्षा क्र. फैजपूरकडून भुसावळकडे जात असतांना अपघात झाला. या अपघातात फैजपूर येथील पोस्ट ऑफिसमधील कार्यरत पोस्ट मास्तर ड्युटी आटोपून रिक्षाने घरी जात होते. त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा गोदावरी हॉस्पीटलमध्ये नेत असतांना मृत्यू झाला. या अपघातातील डंपर सह ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत पोस्ट मास्तर फैजपूर येथे गेल्या दोन वर्षापासून कार्यरत होते. सुस्वभावी तसेच सर्वांना सहकार्याची भूमिका त्यांच्या अंगी असल्याने सर्वांशी आपलेसे केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार असून ते भुसावळ येथील संतोषी माता हॉल परिसरात राहत होते. या घटनेमुळे फैजपूर शहरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.