डंपरमधून 40 हजारांच्या बॅटर्‍यांची चोरी

0

तळेगावः रस्त्याच्या बाजूला उभा केलेल्या दोन डंपरमधून 40 हजार किमतीच्या दोन बॅटर्‍या चोरल्या. ही घटना मंगळवारी इंद्रायणी विद्यामंदिर कॉलनी, तळेगाव येथे घडली. विक्रम बाळासाहेब काकडे (वय 35, जोशीवाडा, तळेगाव) यांनी याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकडे यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या घरासमोरील रस्त्याच्या बाजूला दोन डंपर उभे केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन्ही डंपरमधून 150 व्हॅटच्या 40 हजार रुपये किमतीच्या 4 बॅटर्‍या चोरल्या. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ते डंपर सुरू करू लागले, त्यावेळी डंपर सुरू झाला नाही. त्यांनी डंपर सुरू न होण्याचे कारण शोधले असता, डंपरमधील बॅटर्‍या चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.