चालकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल
यावल- वाळूने भरलेला डंपर झाडावर आदळून अपघात झाल्याची घटना 16 रोजी अंकलेेश्वर -बर्हाणपूर राज्य मार्गावरील किनगाव गावाजवळील हॉटेल मनमंदिरच्या समोर घडली होती. या अपघातात जखमी झालेल्या अमोल मंगा भिल (19, रा.आमोदा, ता.जळगाव) या तरुणाचा 21 रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचे काका दशरथ मानसिंग भिल (रा.आमोदा, ता.जळगाव) यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक सचिन कोळीविरूध्द यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नियंत्रण सुटल्याने झाला होता अपघात
16 मे रोजी रात्री 9 वाजेला वाळूने भरलेला डंपर ( एम.एच. 19 झेड.5858) घेवून चालक सचिन कोळी (रा.फुफनगरी, ता.जळगाव) हा निघाला असताना वाहनावरील ताबा सुटल्याने डंपर थेट निंबाच्या झाडावर धडकला होता. डंपरमधील वाळू या झाडाच्या समोरील दिशेनेे सुमारे 30 फुट अंतरावर विखुरली गेली तर या वाहनात चालक सचिन कोळीसह सह सागर कैलास पवार (19, रा. फुफनगरी) व अमोल भील हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत वाहनातचं सुमारे दोन तास जखमी अडकले होते तेव्हा किनगावातील नागरीकांनी शर्तीचे प्रयत्न करून जखमींना बाहेर काढले होते. डंपर चालक सचिन व अमोल व सागर यांच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रूगणालयात उपचार सुरू होते तर अमोल भिलची प्रकृती अधिक खालावल्याने त्यास मुंबई येथे उपचार्थ हलवण्यात आले होते तेथे 21 मे रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.