डंपर टायर चोरी प्रकरणी आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

0

यावल- अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर अपघातग्रस्त डंपरवरील टायर चोरी करणार्‍या संशयीत कृष्णा शंकर कोळी यास न्यायालयाने पुन्हा दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. 16 मे रोजी किनगाव जवळ वाळूने भरलेल्या डंपरचा अपघात होता. तेव्हापासून डंपर रस्त्याच्या कडेला पडून होते. संशयीताने दोन टायरसह अन्य साहित्य मिळून 45 हजारांचा सामान लांबवला होता. या गुन्ह्यात आरोपीसोबत आणखी कोणी आहे? याचा तपास पोलिस करीत आहेत. त्या दृष्टीने एका दिवसाच्या पोलिस कोठडीत संशयीताने कुठलीच माहिती दिली नाही तेव्हा टायरसह इतर साहित्य चोरी करणे एकट्यास शक्य नाही म्हणून या गुन्ह्यात अजुन आरोपींचा सहभाग असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. सोमवारी आरोपीची पोलिस कोठडी संपल्यावर त्यास येथील प्रथमवर्ग न्यायाधीश डी.जी.जगताप यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता त्यास पुन्हा 1 ऑगष्टपर्यंत दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील तायडे, विकास सोनवणे करीत आहे.