डंपर-ट्रक अपघातात साकेगावच्या डंपर चालकाचा मृत्यू तर क्लीनर जखमी

भुसावळ : दोन ट्रकमध्ये समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात साकेगावच्या रहिवासी युवकाचा मृत्यू झाला तर क्लीनर जखमी झाला. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता नशिराबादजवळील मुंजोबा मंदिराजवळ हा अपघात घडला. या अपघातात डंपर चालक देवानंद नथू पाटील (35) यांचा उपचारार्थ हलवताना मृत्यू झाला तर क्लिनर विकास युवराज कोळी (दोन्ही रा.साकेगाव) हे जखमी झाले.

दोन्ही ट्रक समोरा-समोर धडकले
भुसावळकडून जळगावकडे डंपर (क्रमांक एम.एच.19 झेड.3123) निघाला असतानाच समोरून येणारा डांबराचा टँकर द्धक्रमांक एम.एच.18 बी.ए.4188) ने धडक दिल्याने दोन्ही वाहनाचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातात साकेगावचा डंपर चालक देवानंद पाटील (35) हा चालक डंपरच्या कॅबीनमध्ये अडकल्यानंतर जेसीबी मशीन बोलावून त्यास गंभीर स्थितीत गोदावरीत हलवत असतानाच त्यांचा मृत्यू झाला तर क्लिनर विकास युवराज कोळी या जखमी झाला आहे.