डंपर धडकेत लातूरचा तरुण ठार

0
वाकड : भरधाव जाणार्‍या डंपरची धडक एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. गजानन रामचंद्र मुळे (वय 25, रा. लातुर) असे त्याचे नाव आहे. अपघात गुरुवारी (दि.9) रात्री साडेसातच्या सुमारास वाकड येथे झाला होता.
गजानन वाकड येथील सीसीडी कॅफे समोरील सर्व्हीस रोडवरुन दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी मागून येणार्‍या एका पांढर्‍या रंगाच्या डंपरची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये मुळे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अपघातानंतर डंपर चालक पळून गेला. वाकड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.