Finally, a case has been registered in the case of dumping a dumper from Bhusawal Tehsil भुसावळ : भुसावळ तहसील कार्यालयातून अवैधरीत्या खडीची वाहतूक करणारे डंपर मंगळवारी सकाळी लांबवण्यात आले होते. या प्रकरणी बुधवारी साकेगाव येथील डंपर मालकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
डंपर मालकाचा वाहनासह शोध
महसूल प्रशासनाने अवैधरीत्या खडीची वाहतूक करणारे डंपर (एम.एच.19 झेड. 6363) मंगळवार, 1 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करीत डंपर मालक मनोज सुरेश भागवत (साकेगाव) यांना दंडाबाबत नोटीस बजावली होती मात्र तत्पूर्वीच मनोज भागवत यांनी प्रशासनाची पूर्व परवानगी न घेता तहसील कार्यालयातून लांबवल्याने तलाठी सुरेश वसंत कुंभार (57) यांच्या फिर्यादीवरून भागवत यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार शशीकांत पाटील करीत आहेत.