डंप डेटा शत्रू कंपनीला देणार्‍या दोन कर्मचार्‍यांना अटक

0

मुंबई  – अंधेरीतील एका खाजगी कंपनीची गोपनीय माहिती असलेला डंप डेटा शत्रू कंपनीला देणार्‍या दोन आरोपींना अंधेरी पोलिसांनी अटक केली ओ. अमीत मोरे आणि विवेक चौधरी अशी या दोघांची नावे असून पोलीस कोठडीनंतर या दोघांनाही आज दुपारी येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. तक्रारदार अंधेरी पूर्वेकडील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. याच कंपनीत बी कॉम पदवीधर असलेला अमीत मोरे हा ऑपरेशन मॅनेजर म्हणून कामाला होता. त्याच्यासोबत इतर 19 कर्मचारी कंपनीत कामाला आहे.

ही कंपनीत इलेक्ट्रॉनिक क्षेत्राशी संबंधित आहेत. काही महिन्यांपूर्वी कंपनीने त्यांची गोपनीय माहिती असलेला एक डंप डेटा त्यांच्या कंपनीच्या संगणकाच्या खाजगी सर्व्हेरमध्ये ठेवला होता. त्यात कंपनीसह त्यांच्या इतर कंपन्यांशी असलेल्या व्यवहाराची माहिती दिली होती. ही माहिती अमीत मोरे याने त्याचा मित्र विवेक चोधरीला पाठविली होती. विवेक हा तक्रारदार कंपनीच्या विरुद्ध कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला आहे. या माहितीमुळे त्यांच्या कंपनीला लाखो रुपयांचा नुकसान झाला होता. हा प्रकार नंतर तक्रारदारांच्या लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर अंधेरी पोलिसांनी भादवी आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर विवेक चोधरी आणि अमीत मोरे या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात या दोघांनी आर्थिक व्यवहारातून डंप डेटा चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत होते. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आज दुपारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.