गोल्डकोस्ट: 21 व्या कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये नेमबाजमध्ये श्रेयसी सिंहने डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाची पटकाविले आहे. याआधी ५० मीटर पिस्तुल प्रकारात नेमबाज ओम मिथरवालने भारताला कांस्यपदक मिळवून दिले. नेमबाजीमध्ये आता भारताने एकूण नववे मेडल जिंकले आहे.
हे देखील वाचा
राष्ट्रकुल स्पर्धेच्या डबल ट्रॅपमध्ये श्रेयसी सिंह सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी २०१४ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत श्रेयसीने सहभाग घेतला होता. त्यावेळी तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती.