डब्लूएचओद्वारा फेस मास्क विषयी नवीन मार्गदर्शक तत्वे

0

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच फेस मास्क वापरण्याविषयीचे नवीन मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत.यात आरोग्य कर्मचारी आणि सामान्य नागरिकांनी कोणते मास्क वापरावे या विषयी चे निर्देश सांगितले गेले आहेत.
भारतासह जगभरात लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे.परंतु हा काळ तितक्याच धोक्याचा असून या दरम्यान संपर्कातुन कोरोना विषाणू चा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे परिस्थितीच्या होणाऱ्या बदलामुळे आणि नवनवीन संशोधनातून जुन्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नवीन बदल सुचविले गेले आहेत.

डब्लू.एच.ओ.चे महासंचालक टेड्रॉस एडनोम गॅबेरियस यांनी मास्क वापराबाबत खालील प्रमाणे नवीन मार्गदर्शक सूचना सांगितल्या आहेत.

— आजारी व्यक्तींनी बाहेर निघतांना मास्क घालणे सक्तीचे आहे.(खरं तर आजारी व्यक्तीने बाहेर पडणे योग्य नाही त्यांनी घरीच राहिले पाहिजे. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना आवश्यक निर्देशानुसार औषोधोपचार ची सुविधा आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना विलगिकरणाची व्यवस्था पाहिजे.)

–आरोग्य कर्मचारी तसेच आंतररुग्ण ,दवाखान्यात उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींनी वैद्यकीय दर्जाचे फेस मास्क परिधान करणे आवश्यक आहे.

— आजारी असलेल्यांनी वैद्यकीय दर्जाचे फेस मास्क वापरावे.

–अधिक संसर्ग असेल त्या ठिकाणी ६० वर्षांवरील व्यक्तींनी आणि इतर आजार असलेल्यांनी आणि सोशल डिस्टनसिंग पाळणे शक्य नाही तिथे वैद्यकीय स्थराचे मास्क वापरावे.

–ज्या ठिकाणी संसर्ग अधिक दाट आहे त्याठिकाणी सर्वांनी अधिक जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे.

–बाहेर फिरतांना किंवा इतर व्यवहार करतांना गर्दी करू नये, आवश्यक सोशल डिस्टनसिंग पाळणे गरजेचे आहे.

–सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरणे गरजेचे आहे.

–रेल्वे स्थानक,बस स्थानक ,दवाखाने दूध दुकाने यासारख्या गर्दी असलेल्या ठिकाणी मास्क चा वापर अत्यंत गरजेचा आहे.

–सर्वसामान्य लोकांनी कापडी मास्क वापरावा मात्र तो मास्क तीन अस्तर(लेयर) मध्ये असावा.यात आतून सुती अस्तर असावे तर बाहेरचा थर हा पोलिस्टर चा असावा तर मधला भाग पॉलीप्रॉपिलीन चा असावा.

–बाहेर फिरतांना मास्क घातला आहे म्हणून सोशल डिस्टनसिंग कडे दुर्लक्ष व्हायला नको ते देखील पाळणे गरजेचे आहे.कोरोना विषाणू ला हरविण्यासाठी फेस मास्क वापरणे हा व्यापक रणनीतीचा एक भाग आहे.

–फेस मास्क हा व्यवस्थित घातला गेला पाहिजे,त्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून त्याची गुणवत्ता टिकून राहील.काही लोक मास्क खाली-वर करतांना किंवा मास्क काढ-घाल करतांना अस्वच्छ हाताचा वापर करून स्वतःला जंतूंचा संसर्ग करून घेऊ शकतात ,तेव्हा काळजी घ्यावी.

डॉ धर्मेंद्र पाटील,
नेत्ररोगतज्ञ, जळगाव.
९४२३१८७४८६.