डब्ल्यूवायएन स्टुडिओला इंडिया एंजेल फंडकडून ५० लाखांची फंडिंग

0

मुंबई: सौन्या खुराना आणि विजय गौतम यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या “डब्ल्यूवायएन स्टुडिओ” या कंटेंट स्टार्टअपला इंडिया एंजेल फंडकडून ५० लाख रुपयांची फंडिंग करण्यात आली आहे. टोकियो स्थित इंडिया जपान पार्टनरशिप फंडचे संजीव सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणार्‍या इंडिया एंजेल फंडकडून नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सला फंडिंग करण्यात येते. यात मीडिया आणि एंटरटेनमेंट उद्योगाचे प्रणय अंथवाल, सोहम युनिकॉपचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया आणि इंडिया एंजल नेटवर्कचे सह-संस्थापक राहुल नार्वेकर या दिग्गजांचा समावेश आहे.

डब्ल्यूवायएन विविध ब्रँड, स्टार्टअप्स आणि व्यक्तींसाठी नवीन काळातील मजकूर किंवा कथा तयार करण्याचे काम करते. डब्ल्यूवायएन स्टुडिओने एचपीसारख्या ब्रँडसाठी व्हिडिओ तयार केले आहेत आणि अनेक नामांकित व्यक्ती आणि ब्रांडसाठी पॉडकास्ट देखील तयार केले आहेत. रेडिओ मिर्चीच्या माजी आरजे पल्लवी राव यांच्या ‘कॅन इन्स्पायर’ पॉडकास्टने अ‍ॅपल पॉडकास्टवर प्रथम क्रमांकावर स्थान मिळवले होते. याबाबत डब्ल्यूवायएन स्टुडिओच्या सह-संस्थापक सौन्या खुराना म्हणाल्या की, आम्ही पहिल्या दिवसापासून सकारात्मक पध्दतीने पुढे जात आहोत. सध्याच्या दिवसांमध्ये ऑडिओसाठी सुगीचा काळ असल्याची जाणीव आम्हाला झाल्यानंतर आम्ही त्यावर काम करण्यास सुरुवात केली. यात पहिल्या टप्प्यात यश मिळाल्याने आमचा उत्साह वाढला आहे. या कराराबद्दल बोलताना आयएएएफचे सह-संस्थापक राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही अद्याप औपचारिक संघ स्थापन करण्याच्या प्रक्रियेत असताना, डब्ल्यूवायएनने आतापर्यंत साध्य केलेल्या करारामुळे व त्यांच्या कमाईच्या खर्चावर आणि लक्ष केंद्रित करण्याने मी खूप प्रभावित झालो आहे. डब्ल्यूवायएन स्टुडिओच्या अल्पवधीतील प्रगतीचे संजीव सिन्हा, प्रणय एंथवाल व नरेंद्र फिरोदिया यांनीही कौतूक केले आहे.