डवार्फ वर्ल्ड गेममध्ये भारताला 37 पदके

0

कॅनडा । कॅनडात नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड डवार्फ गेम्समध्ये भारतीय बुटबैंगन खेळाडूंनी इतिहास रचून 37 पदकांची कमाई केली. विशेष म्हणजे भारतीय पथकात सामील झालेले हे खेळाडू वैयक्तीक अडचणी तसेच आर्थिक साहाय्य नसतानाही त्यावर मात करून यशस्वी ठरले. या स्पर्धेत 24 देशांतील बुटबैंगन खेळाडू सामील झाले होते. पदक तालिकेत भारत 10 व्या क्रमांकावर आला.

भारताने मिळवलेल्या एकूण 37 पदकांत 15 सुवर्णपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील धावपटू देवप्पा मोरे म्हणाले की कर्नाटकातून जे खेळाडू या स्पर्धेसाठी आले त्याना सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. मोरे यांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्वतःची शेतजमीन गहाण ठेवून खर्चासाठी 2 लाख रुपये जमविले. त्यांनी या स्पर्धेत 100 मीटर रनिंगमध्ये सुवर्ण तर 200 मीटरमध्ये रजत पदक मिळवले. कर्नाटकातील 7 स्पर्धकांनी या स्पर्धेत 16 पदकांची कमाई केली. त्यात 9 सुवर्ण, 4 रजत व 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. एकूण 24 देशांतून आलेल्या 400 खेळाडूंमध्ये भारताचे जॉबी मॅथ्यू यांनी दोन सुवर्ण, 3 रजत व 1 कांस्यपदक मिळवले.