डांगुर्णे येथे गाव दरवाज्यावर झेंडा लावण्याच्या वादातून हाणामारी

0

धुळे । शिंदखेडा तालुक्रातील डांगुर्णे गावात अक्षरतृतीरेच्रा पूर्वसंध्रेस शिवजरंती मिरवणुकीसाठी गावदरवाजावर मानाचा झेंडा लावण्याच्या वादातून बुधवार, 18 रोजी दुपारी दोन गटात तुफान हाणामारी झाली. दगडफेकीत 4 ते 5 जण जखमी झाले असून एकजण गंभीर जखमी होऊन गावात तणाव निर्माण झाला. राप्रकरणी रात्री उशिरा परस्परविरोधी फिर्यादीवरुन दोन्ही गटातील सुमारे 28 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्रात आला.

परस्परविरोधी गुन्हे दाखल
घटनेबाबत गोरख हिलाल पाटील (49) याने दिलेल्या फिर्यादीवरुन सचिन मोरे, अनिल मोरे, भगवान मोरे, साहेबराव मोरे, मुन्ना मोरे, शांतीलाल मोरे, भटू मोरे याचा भाचा पाटोळे, दिलीप मोरे यांचा मुलगा, शांतीलाल मोरे, सागर मोरे, प्रशांत मोरे, विशाल साळवे सर्व रा.डांगुर्र्णे यांच्याविरुध्द दगडफेक करीत काठ्या लाठ्यांनी मारहाण करणे, घरात अनधिकृतपणे घुसून महिलेचा विनयभंग करुन गळ्यातील मंगळसुत्र, सोन्याची चैन असा 74 हजाराचा ऐवज हिसाकावून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दिनेश शालीग्राम बैसाणे (वय34) च्रा तक्रारीवरुन आकाश पाटील, जितेंद्र कोळी, गोरख पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, चुडामण पाटील, जयेश पाटील, रमेश पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, नरेंद्र पाटील, भास्कर पाटील, प्रविण मोहन पाटील, पुरोजीत पाटील, सतिष पाटील, माधवराव पाटील यांच्याविरुध्द जातीवाचक शिवीगाळ केली, फिर्यादीच्या भावास दगडफेक करुन गंभीर जखमी केले व महिलेचा विनयभंग करीत गळ्यातील 30 ग्रॅमचे 75 हजाराचे मंगळसुत्र तोडून नेले म्हणून अ‍ॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

4 ते 5 जण जखमी
शिंदखेड्यापासून 15 ते 20 कि.मी. अंतरावर असलेल्रा डांगुर्णे गावात अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस अगोदर शिवजरंती मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. त्यासाठी गाव दरवाजावर झेंडे लावण्याच्या कारणातून बुधवार, 18 रोजी दुपारी 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास वाद निर्माण झाला. रा वादाचे पर्रवसान हाणामारीत होऊन तुफान धुमश्‍चक्री उडाली. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केल्राने तणावात आणखीनच भर पडली. रात 4 ते 5 जण जखमी तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यास धुळे येथील एका खासगी रुग्णालरात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, शिंदखेडा पोलिस ठाण्राचे पोलिस निरीक्षक संतोष बोराडे हे अधिकारी फौजफाट्यासह डांगुर्णे गावात दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून गावात शांतता प्रस्थापित केली. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटातील 7 ते 8 जणांना ताब्यात घेतले असून गावात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.