डांगे चौकात टपर्‍या, हातगाड्यांवर कारवाई

0
वाकड : वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्ते मोकळे करणे महत्वाचे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका अतिक्रमण विभाग आणि वाकड पोलीस यांच्या वतीने डांगे चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या हातगाडी आणि दुकानांवर कारवाई करण्यात आली. ही करावी आज (सोमवारी) करण्यात आली. यामध्ये 15 हातगाड्या आणि 4 दुकाने जप्त करण्यात आली. आयुक्तालय हद्दीतील वाहतूक सुरळीत आणि विनाअडथळा सुरू राहण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसेच वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये आज डांगे चौकात वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच चार दुकाने देखील जप्त करण्यात आली.