जळगाव : 115 ग्रॅम डांबर परस्पर विक्री करून अपहार केल्याप्रकरणी टँकरवरीचालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीसांनी संशयित चालक परवेज खान जाहेद अली याला अटक करून शनिवारी न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायलयात हजर केले असता त्यांनी त्याला 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
एल.एच.पाटील कन्सट्रक्शन येथील मॅनेजर उदेसिंग जामसिंग पाटील यांनी हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून डांबर मागविले होते. सदर डांबर चालक परवेज खान जाहेद अली याने टँकर क्रं. एमएच.04.एफयु.3594 ने आणला. मात्र, म्हसावद येथील ओम जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी येथे टोल काट्यावर डांबरचे वजन केले असता 115 ग्रॅम डांबर कमी भरले. यावेळी चालक याने प्रत्येकी 30 रुपये किलो प्रमाणे एकूण 3450 रुपयांचे 115 ग्रँम डांबर परस्पर विक्री केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी उदेसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून टँकर चालकाविरूध्द गुन्हा दाखल होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी संशयित चालक परवेज खान याला शुक्रवारी अटक केली. त्याला न्या. बी.डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. गोरे यांनी त्यास 9 जानेवारीपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.