डांबरीकरण झालेल्या रस्त्याची चौकशी करण्याची केली रहिवाशांनी मागणी

0

नवापूर। शहरातील सुशिक्षित व प्रतिष्ठित लोकवस्ती असलेल्या हनुमान मंदिर ते ठाकोर छबिलदास चौक सराफ गल्ली भागातील डांबरीकरण रस्त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी सराफ गल्लीतील रहिवाशांनी केली आहे.बहुचर्चित असलेल्या सराफ गल्लीतील निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण प्रकरण रहिवाशांच्या जागृतीने उघडकीस आले. पावसाळ्यात तर या भागात तलावाचे स्वरूप प्राप्त होत होते रस्ता परत करून देतो असे आश्वासन देऊन ते अद्याप झालेले नाही.अखेर आज सराफी गल्लीतील असंख्य नागरिक यांनी नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांची भेट घेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यांचाशी चर्चा केली व यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी रहिवांशाशी बोलतांना,आठ दिवसात तुमच्या प्रभागातील समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.

भिकमांगो आंदोलन करू : यावर रहिवाशांनी सांगितले की आठ दिवसांत आमच्या समस्येचे निराकरण व रस्त्याचे निपक्षपाती चौकशी झाली नाही तर भिक मांगो आंदोलन करू व हे प्रकरण वरपर्यंत नेवू असा इशारा दिला.यानंतर निवदेन दिले. सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य करून लोकप्रतिनिधीनी हा रस्ता पुन्हा बनवण्यासाठी जनरल सभेत पास केल्याने सिध्द झाले आहे. आम्ही सराफ गल्लीतील रहिवासी विनंतीपुर्वक सांगु इच्छितो की सदर रस्त्याची दर्जा व गुणवत्ता क्वालिटी कंट्रोल शासनाच्या अधिकृत संस्थेकडुन पारदर्शक चौकशी आठ दिवसाचा आत करण्यात यावी.अन्यथा आम्ही सराफ गल्लीतील सर्व रहिवासी भीक मांगो आंदोलन करून आलेली भीक (आर्थिक मदत) नगरपालिकेला देण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावेळी रहिवाशांनी संबंधित प्रभागातील लोक प्रतिनिधी यांच्याबदल संतप्त प्रतिक्रया व्यक्त केल्या. सदर निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना ही देण्यात आले.

सराफ गल्लीतील प्रकरण चर्चेत
निवेदनात भरत पाटील,दिलीप दलाल,शरदचंद्र पाटील, डॉ.के.बी.भट,भटु सोनार,हरीश पाटील,जनक दलाल,दर्शन पाटील,मंगेश येवले,प्रेमेद्र पाटील,जयंतीलाल शहा, दर्पण पाटील,मनोज दलाल,हेमा जोशी,दिलीप पाटील,मेहुल पारेख,अल्पेश दलाल,जनक दलाल,सचिन पाटील,काशिनाथ सोनार,हेमेश पुराणिक,अनिल पाटील,डॉ गुंतीलाल गावीत,हसमुख दुसाणे,कमलेश पाटील,दत्ताञय अहिरे,आनंद वशिष्ठ,उमाकांत खैरनार,संजय पाटील,योगेश गावीत,बीना पाटील,नितीन मावची,गोपाल मराठे,प्रमोद थोरात, संजय चव्हाण आदि शेकडो रहिवांशाच्या सह्या आहेत.सध्या सराफ गल्लीतील प्रकरण फारच गाजत असुन सर्वत्र एकच चर्चा आहे.