नवापूर। नवापुर शहरात दि.23 ला मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. या मुसळधार पाऊसाने नगरपालिकेने शहरात काही महिन्यापुर्वी नविन डांबरीकरणाने बनवलेल्या रस्ताचा भांडाफोड केला आहे. शहरातील काही भागात नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरील कपची खडी रेती डांबर निघून तेथे पाण्याचे डबके साचुन तलाव, स्वीमिंग पुलचे स्वरूप प्राप्त झाले होते.तसेच शहरात जागो जागी उंच गतीरोध बसविल्यामुळे गल्लोगल्ली पाऊसाचा पाण्यामुळे नदीचे स्वरुप तयार झाले होते. त्याच बरोबर शहरातील सराफ गल्लीत, ठाकुर छबीलदास यांचा घरापासुन ते जि.प कन्याशाळे पर्यत नविन डांबरीकरण रस्ता तयार करण्यात आला आहे.माञ हा रस्ता निकृष्ठ दर्जचा तयार केला असुन मे महिण्यात या रस्त्याला खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती.
डांबरीकरण रस्त्याचा निकृष्ट दर्जाचा पुरावा
डांबर वितळून खडी कपची बाहेर निघून गेली आहे.या कामाबद्दल सराफ गल्लीतील रहीशांनी वेळोवेळी जाऊन मुख्यधिकारी, नगरसेवक, नगराध्यक्ष यांचा कडे तक्रार केली होती.माञ त्यांनी मौखीक आश्वसन देऊन सांगितले होते की तयार झालेला डांबरीकरण रस्ता आम्ही तुम्हाला मे महिन्यात परत तयार करुन देऊ, माञ मे महिना निघुन जुन महिना आला माञ रस्ता तयार करुन दिला नाही.मुसळधार पावसाने सराफगल्लीतील 9 लाख रुपये खर्चून बनवलेल्या डांबरीकरण रस्त्याचे बारा वाजवले आहेत.
पाण्याची विल्हेवाट लावुन देऊ
यानंतर मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे हे सराफ गल्लीत आले व त्यांनी समस्याची पहाणी केली.व त्यांनी सांगितले की ज्या भागात पावसाचे पाणी साचत आहे त्या त्या भागात कुंडी तयार करुन पाण्याची विल्हेवाट लावुन देऊ असे आश्वासन दिले. माञ ज्या लोकप्रतिनिधीना ज्या रहिवाशांनी निवडुन दिले आहे त्यांनी माञ रहिवाशांशी साधी चर्चा सुध्दा केली नाही. समस्या जाणून न घेता फक्त बघ्याची भूमिका घेतली.