डांभुर्णी। येथील ग्रामपंचायत बर्याच पैकी वेगवेगळ्या विषयांवर सध्या जिल्ह्याभरात नावलौकिक झाली आहे. या ठिकाणी पंचायतीच्या भोंगळ कारभाराची चौकशी कामी विद्यमान सदस्या नर्मदाबाई कोळी यांनी बिडीओंसह वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी अर्ज करूनही शासकीय अधिकारी व कर्मचारी कुठलेही ठोस पाऊल उचलत नसल्याचे नर्मदा कोळींनी सांगितले. याचे उदाहरण म्हणजे एक ते दिड वर्षांच्या कालावधीत कामकाच करणारा ग्रामसेवक, अनधिकृत पणे निवडलेला उपसरपंच तथा निवडणुका होऊन मुदत बाह्य वेळेतही जात वैधता प्रमाणपत्र सादरीकरण न करूनही सदस्यत्व शाबूत असल्याने शासनाच्या निदर्षणात आणण्यासाठी कोळींनी वेगवेगळे तक्रारी अर्ज सादर केले आहेत.
नर्मदा कोळी यांनी अप्पर जिल्हाधिकार्यांकडे उपसरपंच रमेश कोळी तथा सदस्य समाधान कोळी, रेखा कोळी यांचे विरुध्द विवाद तक्रारी अर्ज क्र.131/2016 व 110/2016 हा केला होता. त्याचे कामकाज अप्पर जिल्हाधिकारी राहूल मुंडके यांच्याकडे सुरू असतांना नर्मदा कोळी यांचे वकिल अँड.गजानन पी जाधव यांच्या मार्गदर्शना खाली अॅड.रविता देवराज यांनी काम पाहिले वरून 29 एप्रील 2017 रोजी विवाद अर्ज क्र. 131/2016 व 110/2016 हे मंजूर करण्यात आले असून सामनेवाले रमेश सांडू कोळी याचे उपसरपंच पद कमी करून त्यांचे सदस्यत्व व रेखाबाई काशिनाथ कोळी यांचे ही सदस्यत्व कमी करत त्यांना अप्पर जिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी अपात्र घोषित केले आहे. तसेच तिसरे सदस्य समाधान कोळी यांना पात्र ठेऊन त्यांच्यावर कृपाद्रुष्टी असल्याचे जनतेत बोलले जात आहे. या बाबत नर्मदा कोळी यांनी यावल येथील तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना निकालाची माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या पत्राला केराची टोपली
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे 10 आक्टोबर 2016 रोजी नर्मदा कोळी यांनी ग्रामसेवकाच्या चुकीच्या निवडी बाबत अर्ज सादर केला असून आजपर्यंत येथे नविन ग्रा.वि.अधिकारी मिळालेले नाही. या बाबतीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं.मिनल कुटे यांच्याकडे 31 जानेवरी 2016 रोजी अर्ज सादर करून विचारले कोळींनी असता नविन ग्रामसेवक दिवाकर विठोबा दोडके यांची निवड झाल्याचे मिनल कुटे याचेकडून सांगण्यात आले. मात्र आजपर्यंत येथे नेमुन दिलेला अधिकारी हजर न झाल्याने नियमांचे उल्लंघन होत आहे. गटविकास अधिकार्यांचा मनमुरादपणा सुरू असून केलेला गोंधळ जनतेच्या निदर्षणास येत आहे. वरिष्ठांकडून गटविकास अधिकार्यांना वारंवार अतितातडीचे स्मरण पत्र पाठवले जात असूनही या अधिकार्याला कायद्या व वरिष्ठांचा धाक राहिलेला नसल्याचे तालुक्यात बोलले जात आहे. याबाबत तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.