डांभुर्णी परिसरात नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांना सुरूवात

0

डांभुर्णी । डांभुर्णी परिसरात झालेल्या बेमोसमी वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या तोंडी आलेला घास हिरावला असून या नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यास सुरुवात करण्यात आली आहे. वादळी पावसामुळे हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. परिसरात केळी, गहू, मका, बाजरी, टरबूज, पपई या पिकांचे भरपूर नुकसान झाले. काही प्रमाणावर आमराई कैरी झोडपल्या गेल्याचे निदर्शणास पडत आहे. वादळासह पाऊस व गारा पडल्याने झालेल्या शेतकर्‍यांच्या शेत पिकांबाबत आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून चौकशी खुलासा घेऊन शासकीय अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता यावल महसूलचे अधिकारी तहसिलदार कुंदन हिरे व सी.जे.पाळवी, मंडळाधिकारी व्ही.एस.पाटील यांच्यासह आडगाव, नायगाव, चिंचोली, किनगाव येथील शेतकर्‍यांच्या शेतात पाहणी केली.