Rape On Young Woman in Dambhurni : Section extended to crime यावल : तालुक्यातील डांभूर्णी येथून फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची बाब उघड झाली असून पोलिसांनी गुन्ह्यात कलम वाढवले आहे.
सुरतमध्ये अत्याचार केल्याचे उघड
डांभूर्णी, ता.यावल येथील अल्पवयीन मुलीला गावातीलच संशयीत निलेश काशीनाथ कुंभार या तरुणाने फुस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी यावल पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी अल्पयीन मुलगी यावल पोलिस ठाण्यात आल्यानंतर तिने संशयीत निलेश कुंभार याने गुजरात राज्यातील सुरत येथे नेते अत्याचार केल्याची माहिती दिली तसेच त्यानंतर बुधवारी यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटजवळ सोडून पळ काढल्याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को व लैंगिक अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले.
अल्पवयीन तरुणीची जळगावात रवानगी
अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला बाल कल्याण समिती, जळगाव येथे पाठवण्यात आले. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी निलेश कुंभार याचा शोध पोलीस घेत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.