यावल- तालुक्यातील डांभूर्णी गावातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख् प्रवेशद्वारचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांना त्यात यश न आल्याने लाखोंची रोकड मात्र सुरक्षित राहिली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. डांभुर्णी गावात बसस्थानकानजीक जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. मंगळवारी दैनंदिन कामकाज करून शाखा व्यवस्थापक रामचंद्र जैस्वाल हे शाखेला कुलूप लावून घरी गेले होते. बुधवारी सकाळी या शाखेची प्रवेश द्वाराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत नागरीकांना दिसून आले. हीर माहिती शाखा व्यवस्थापनांना देण्यात आली. माहिती मिळताच शाखा व्यवस्थापक जैस्वाल बँकेत पोहोचले. बँकेच्या तिजोरीची पाहणी केली असता तिला देखील तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या तिजोरी सहा लाख 27 हजार 77 रुपये होते, ते सुरक्षित असल्याचे बँक सूत्रांनी सांगितले.
सूचनांकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष
बँक प्रशासनाला बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना दिल्या मात्र बँक सतत याकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. आता बँकेला लेखी पत्र देऊन तिथेच सीसीटीव्ही व सुरक्षा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे पोलिस निरीक्षक डी.के. परदेशी यांनी सांगितले.