डांभूर्णी, सावखेड्यात विकासकामांचे भूमिपूजन

0

वरखेडी । पाचोरा तालुक्यातीील डाभूर्णी, सावखेडा बु.खु.येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन तथा जलपूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पिपळगाव हरे येथे मुलभूत सुविधा अंतर्गत गाव चावडीचे भूमिपूजन तथा जिल्हा परिषद सचिन विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बाधण्यात आलेल्या केटी वेअर जलपूजन, सावखेडा खुर्द येथे गाव चावडीचे भूमिपूजन, सावखेडा बु. यागावी गाव चावडीचे भूमिपूजन व बहुळानदीवरील जलयुक्त शिवर योजने अंतर्गत बांधलेल्या सिमेंट बंधार्‍याचे जल पूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या केटी वेअर बंधार्‍यामुळे जल साठा वाढून विहिरीची पाणी पातळी वाढण्यास मदत मिळणार आहे.

अ‍ॅड.दिनकर देवरे, दिपकसिग राजपूत, उध्दव मराठे, सरपंच किरण पाटील , उपसरपंच कैलास ताबे, अरुण पाटील, अ‍ॅड.राजेंद्र परदेशी, ज्ञानेश्वर सोनार, जयसिंग दादा, भावसिंग दादा, भैय्या परदेशी, अण्णा परदेशी, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, रमेश बाफना, रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रामलाल गांगे, गोकुळ परदेशी, ईश्वर परदेशी, युवराज पाटील, पितांबर पाटील, प्रकाश मोची, प्रकाश तांबे प्रकाश डोभाळ, दिपक परदेशी, भावलाल परदेशी, शिवाजी परदेशी, राजुपरदेशी, भिमसिंग परदेशी, सुनील पाटील, रमेश मिस्तरी, इकबाल तडवी, जणजित तडवी, भरत परदेशी, जगदीश परदेशी, कैलास परदेशी, शांतीलाल महावीर, संतोष परदेशी, पदम परदेशी, कन्हैयालाल परदेशी आदी उपस्थित होते.