शॉकअप स्प्रिंग फाटल्याने भुसावळात बदलला डबा
भुसावळ- डाऊन 12859 सीएसटी-हावडा गीतांजली एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्याती शॉकअप एअर स्प्रिंग फाटल्याची घटना भुसावळ स्थानक आल्यानंतर सीएनडब्ल्यू कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. या बाबीची वरीष्ठांना माहिती कळवल्यानंतर भुसावळ स्थानकावर हा डबा बदलण्यात आला. या प्रक्रियेत तब्बल सव्वा तासांचा विलंब झाल्याने प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला.
कर्मचार्यांची सतर्कता
डाऊन गीतांजली एक्स्प्रेस भुसावळ रेल्वे स्थानकात प्रवेश करीत असताना गार्डनंतरचा शेवटून दुसरा असलेल्या सर्वसाधारण डब्याची (एसई 168414 सी) शॉकअप एअर स्प्रिंग फाटल्याचे लक्षात आल्यानंतर सीएनडब्ल्यू कर्मचार्यांनी वरीष्ठांना माहिती कळवली. यावेळी वरीष्ठ अधिकार्यांनी धाव घेत संबंधित डबा काढून तो कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये हलवला. या प्रकारात तब्ब्ल सव्वा तास विलंब होवून गाडी 3.25 वाजेच्या सुमारास पुढील प्रवासाला मार्गस्थ झा.