डाऊन गीतांजली एक्स्प्रेसला भुसावळात लावले जनरेटर

0

अनेक गाड्यांचा खोळंबा ; रेल्वे प्रवाशांचे ; आगीची होणार चौकशी

भुसावळ- डाऊन 12859 गीतांजली एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला (पॉवर कार) आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी 12.15 शिरसोली स्थानकाजवळ गार्ड व प्रवाशांच्या सतर्कतेने लक्षात आली होती. 24 डब्यांच्या गाडीतील अखेरचा दुर्घटनाग्रस्त जनरेटर असलेल्या बोगीला हटवल्यानंतर 12.50 वाजता शिरसोलीवरून गाडी हलली तर भुसावळात 1.30 वाजता ही गाडी दाखल झाल्यानंतर 12860 अप गीतांजली एक्सप्रेसला इंजिनानंतर लावलेली एक जनरेटर बोगी काढून डाऊन गीतांजलीला लावण्यात आली. या प्रक्रियेत तब्बल 77 मिनिटे गाडीला आणखीन विलंब होवून 2.47 वाजता डाऊन गीतांजली पुढील प्रवासासाठी रवाना झाली तर प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

पाच गाड्यांना विलंब
गीतांजलीच्या जनरेटर बोगीला आग लागल्यानंतर अप्रिय घटना टळण्यासाठी डाऊन काशी सुमारे तासभर जळगावात थांबवण्यात आला तर अप गोवा एक्स्प्रेसही पाचोर्‍याजवळ थांबवून ठेवण्यात आली तसेच अपचा पुष्पक, कर्नाटक एक्स्प्रेसही भुसावळात सुमारे तासभर थांबवून ठेवण्यात आला तसेच अप गीतांजली एक्स्प्रेसमधील जनरेटर बोगी काढण्याच्या प्रक्रियेत अप गीतांजलीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आगीची चौकशी ; ‘तो’ डबा भुसावळात
डाऊन गीतांजली एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी पॅनलची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, शिरसोली स्थानकावरील आग लागलेला डबा भुसावळात यार्डात आणण्यात आला असून तो निरीक्षणासाठी मुंबईला नेण्यात येणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.