भुसावळ। डाक विभागातील रिक्त असलेल्या जागा त्वरीत भरण्यात याव्या, जीडीएस कमिटी अहवालाचे निकष लागू करण्यात यावे, भागिदारीचे नियम आदी मागण्या तसेच खाजगीकरणाविरोधात अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेतर्फे भुसावळ विभागात संप पुकारण्यात आला. यात वर्ग 3, वर्ग 4 आणि जीडीएस कर्मचार्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतल्याने संप यशस्वी झाला आहे. मुख्य कार्यालयाबाहेर शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.
संघटनेतर्फे करण्यात आलेल्या मागण्या
डाक विभागातील सर्व प्रकारच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, जीडीएस कमिटी अहवाल ालगू करण्यात यावा व जीडीएस कर्मचार्यांना नागरि सेवक दर्जा देर्यात यावा, मेंबरशिप व्हेरिफिकेशनचा निकाल जाहीर करण्यात यावा, नवीन योजना, तंत्रज्ञान तसेच निष्काळजीपणाच्या नावावर होणारा छळ व अन्याय थांबविण्यात याव. तसेच कामगार संघटनांची फसवरूक थांबविण्यात यावी.
पाच दिवसांचा आठवडा लागू करा
तसेच कॅजुअल, कंत्राटी व रोजंदारी कर्मचार्यांना सुधारित दराने वेतन व त्यांची थकबाकी मिळावी, सरकारी प्रणालीचे खाजगीकरण, आऊटसोर्सिंग व कंत्राटीकरण थांबबा, नवीन पेंशन योजनेऐवजी शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के पेंशन लागू करण्यात यावी, डाक विभागात पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा.
ग्राहक परतले माघारी
डाक विभागातील ग्रामीण डाकसेवकांनी पुकारलेल्या संपा पाठोपाठ आता शहरी भागातील कार्यालयीन कर्मचार्यांनी देखील आपल्या विविध मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात लाक्षणिक संप पुकारला. यामुळे आज दिवसभर मुख्य डाक कार्यालयाचे कामकाज पुर्णत: बंद होते. त्यामुळे कार्यालयात आपल्या कामानिमित्त येणार्या ग्राहकांना माघारी परतावे लागले. उद्यापासून कामकाज सुरळीत होणार असल्याचे संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.