नगर । अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेने मुख्य पोस्ट ऑफिससमोर ग्रामीण डाक सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारी निदर्शने केली. संघटनेने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी बुधवारपासून संप पुकारला असून यामध्ये जिल्ह्यातील जवळपास 600 डाकसेवक सहभागी झाले आहेत.
दोन्ही आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्याने अखेर 16 ऑगस्टपासून ग्रामीण डाक सेवकांनी बेमुदत संप पुकारला आहे.