जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभातील संगणक केंद्राअंतर्गत उभारण्यात आलेल्या डाटा सेंटरचे उद्घाटन कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाला बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून डाटा सेंटर विकसीत करण्यात आले आहे. या डाटा सेंटरमध्ये 10 सर्व्हर ठेवता येईल तसेच 1994 पासूनच्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रके, पदवी प्रमाणपत्रांचा संगणकिय साठा या केंद्रामध्ये साठविण्यात आला आहे.
यांची होती कार्यक्रमाला उपस्थिती
राज्य शासनाने नियुक्त केलेल्या परीक्षा सुधार समितीच्या शिफारसीप्रमाणे प्रत्येक विद्यापीठात परीक्षा विषयक कार्यप्रणालीसाठी डाटा सेंटर आवश्यक आहे. या डाटा सेंटरसाठी डॉ.समीर नारखेडे, हुसौन दाऊदी, प्रभारी संगणकप्रमुख विनोद पाटील, कपील गिरी यांची तांत्रिक समिती गठीत करण्यात आली होती. या उद्घाटन प्रसंगी कुलगुरुंसमवेत बीसीयुडी संचालक प्रा.पी.पी.माहुलीकर, डॉ.धनंजय गुजराथी, प्र.कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, डॉ.बी.डी.कर्हाड, विनोद पाटील, कपील गिरी, के.बी.चौधरी, फुलचंद अग्रवाल, डॉ.आर.पी.पाटील, डी.बी.बागले, डॉ.सुधीर भटकर, पी.एस.पाटील आदी उपस्थित होते.