खोपोली । संपूर्ण आयुष्यभर कुटूंबाचा गाढा ओडणार्या स्त्रीला सर्व क्षेत्रात 20 टक्क्यांवरून 50 टक्के आरक्षण देऊन राजकारणात महिलांना समान संधी देण्याची दूरदृष्टी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवल्यानेच महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी व्यक्त केले असून, आजच्या स्थितीत दररोज महिलांवर अन्याय अत्याचार होत असल्याने केंद्र व राज्य सरकारने कठोर पावले उचलत समाजातील विकृती बदलली पाहिजे अशी खंत व्यक्त करत कर्जत-खालापूर मतदारसंघातील जनता भाग्यवान आहे की त्यांना सुरेश लाड यांच्यासारखा क्रियाशील आमदार मिळाला आहे सांगत आमदार लाड यांच्या विकासकामांचे कौतुक केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नवरा दारू पित असल्याने घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना किंवा मुलांच्या शिक्षणासाठी आपले दागिने गहान ठेवून मुलांचे शिक्षण पूर्ण करणार्या खोपोली शहरातील मातांचा गौरव सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या उपस्थित छत्रपती शाहू महाराज सभागृहात पार पडला. यावेळी प्रदेश सचिव, जिल्हाध्यक्षा दीपिका चिपळूणकर, नगराध्यक्ष सुमन औसरमल, माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक मनेष यादव, नगरसेवक मंगेश दळवी,राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील, कर्जत-खालापूर युवती संघटक प्रतीक्षा सुरेश लाड, महिला खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा गायकवाड (मोरे), सुनंदा दत्ताजीराव मसुरकर, खोनपाच्या आरोग्य सभापती आलका शेंडे, महिला बालकल्याण सभापती केविना गायकवाड, नगरसेविका लीला डुमणे, वैशाली जाधव, राष्ट्रवादीचे भास्कर लांडगे, संतोष केदारी, विनोद रजपूत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आजच्या काळात हम दो और हमरा एक एक अशी भावना निर्माण
आजच्या काळात हम दो और हमरा एक एक अशी भावना निर्माण झाल्याने कुटुंब व्यवस्था हरवली असल्याचे सांगत आईवडील दोघे कामासाठी घराबाहेर जात असल्याने मुलांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे पुढील पिढीची चिंता वाटत असून मुलगी मोठी झाली की, विवाहानंतर मुलीला सासू कशी मिळेल याची चिंता वाटायची. परंतु, आजच्या परिस्थिती सासूला सून कशी मिळेल याची चिंता वाटत आहे. या जबाबदार आहे ती काळाप्रमाणे बदल घडत आहे. त्यामुळे देशाचा खरा कणा कुटुंब असल्याने महिलांनी कुटुंबांवर चांगले संस्कार करा, असे आवाहन करत राज्यात डान्सबार बंदी व महिलांना पोलीस भरतीत प्राधान्य माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर.पाटील यांच्यामुळे मिळाले आहे.
त्यांचे स्मरण आजच्या दिवशी होणे क्रमप्राप्त असून कर्जत-खालापूर मतदारसंघातील जनता भाग्यवान आहे की त्यांना सुरेश लाडसारखा क्रियाशील आमदार मिळाला आहे, तर स्वतःचा मतदारसंघ नसतानाही दर्याखोर्यात राहणार्या जनतेसाठी धडपणार्या आमदार मी पाहिला असल्याचे सांगत लाड यांचे कौतुक प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी करत महिलादिनी शहर अध्यक्ष सुवर्णा मोरे यांनी उत्तम कार्यक्रम आयोजित करून महिलांना स्फूर्ती देण्याचे काम केल्याने तिच्या सर्व महिला कार्यकर्त्यांना धन्यवाद देत पाककला स्पर्धेत शहरातील महिलांना बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत त्यांचेही कौतुक केले, तर यावेळी परफेक्ट मँचिंग, डान्स स्पर्धा, संगीत खुर्ची, लकी ड्रॉ कुपन, असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे व महिलांचे आभार आमदार सुरेश लाड यांची कन्या कर्जत-खालापूर युवती संघटक प्रतीक्षा लाड यांनी मानले, तर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला उपाध्यक्षा तेजश्री सुर्वे, मीना पवार, सचिव प्राजक्ता शिर्के, जयश्री डोंगरे, रोहिणी गायकवाड, अरुणा गायकवाड, अश्विनी ढोळे, रेखा जाधव यांच्यासह सर्व महिला पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.