डान्सबार सुरु झाल्याने ‘छोटा पेंग्विन’ खूश असेल; निलेश राणेंची सेनेवर टीका

0

मुंबई- सुप्रीम कोर्टाने काल महाराष्ट्रात पुन्हा डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला. यावरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाइट लाइफला परवानगी मिळावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. यावरून निलेश राणे यांनी मुंबई नाइट लाइफची मागणी पूर्ण झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल, असे ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे.

निलेश राणे हे शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याने शिवसैनिकांनी काही ठिकाणी त्यांचे पुतळेही जाळले होते. या घडामोडी ताज्या असतानाच आता निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले..

निलेश राणे यांनी आणखी एका ट्विटमध्ये बेस्ट संपावरुन शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेवरही टीका केली. स्क्रिप्ट लिहायचे काम संजय राऊत यांचे आहे. स्वतःकडून प्रश्न सुटत नाही आणि दुसऱ्याने सोडवले की सहन होत नाही. ह्या स्वभावाला चिंधीगिरी म्हणतात, असे निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.