चाळीसगाव । तालुक्यातील डामरून येथून शेतात जातो असे सांगून 36 वर्षीय इसम 1 जुलै पासून घर सोडून गेला आहे तो अद्यापर्यत घरी न परतलयाने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील डामरुन येथील एकनाथ पोपट पाटील (36) हे बेपत्ता झाले आहे. शोध घेतला असता ते मिळून न आल्याने त्यांचे वडील पोपट पाटील (59) यांचे खबरी वरुन हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. एकनाथ पाटील यांचे वर्णन रंग सावळा, उंची 5 फूट 6 इंच, अंगात फिकट गुलाबी शर्ट, तपकिरी रंगाची पॅन्ट असे आहे. पुढील तपास पोलीस नाईक भूपेश वंजारी करीत आहेत.