टायटॅनोसॉर हा महाकाय डायनोसॉर समजला जातो पण तोही ज्याच्यापुढे खुजा ठरेल असा पेटॅगोटायटन हा डायनोसार शास्त्रज्ञांनी शोधुन काढला आहे. त्याचा आहार झाडेझुडपे हा होता आणि त्याते वजन ७६ टन होते. एखाद्या उपग्रहाएवढे हे वजन आहे. डायनॉसॉरचे जीवाश्म दक्षिण अर्जेंटिनात २०१२ मध्ये सापडले. संशोधकांच्या गटाने त्यांना टायटेनॉसॉर असे नाव दिले. त्यांच्याविषयी माहिती प्रोसिडिंग ऑफ रॉयल सोसायटी बी या जर्नलमध्ये छापली आहे. पेटॅगोनिया प्रांतात तो सापडला म्हणून त्याला पेटॅगोटायटन असे नाव देण्यात आले. ग्रीक भाषेत टायटन म्हणजे महाकाय. पेटॅगोटायटनच्या १० कोटी वर्षापूर्वीच्या सहा जीवाश्मांचा अभ्यास करण्यात आला. ते १२२ फुट लांब खांद्यांजवळ २० फुट उंच होते. या डायनोसॉरची प्रतिकृती अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी येथे ठेवण्यात आली आहे. हॉलमधून त्याची मान बाहेर येते इतका तो मोठा आहे. या आधी टायटानोसॉर गटातील अर्जेंटिनोसॉरसला सर्वात
मोठा डायनॉसॉर मानला जाई.
Next Post