डायपरमधून तस्करी; 606 ग्रॅम सोने जप्त

0

पुणे । दुबईहून आलेल्या प्रवाशाकडे एकाने बेबी डायपर सोपविले होते़ रविवारी पहाटे दुबईहून स्पाईस जेटचे विमान आले़ या विमानातील प्रवाशाकडील बेबी डायपरविषयी सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना संशय आला़ त्यांनी त्याची तपासणी केल्यावर त्याच्या प्रेस बटणामध्ये 2-3 ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा लावलेल्या आढळून आल्या़ त्यावर रेडियमचे प्लेटिंग करण्यात आले होते़ त्या प्रेस बटणांमध्ये एकूण 606 ग्रामचे सोने आणण्यात येत होते़ त्याची बाजारातील किंमत सुमारे 18 लाख रुपये असल्याचे सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले़

दुबई व अबुधाबीहून येणार्‍या विमानातून प्रामुख्याने सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे़ त्यामुळे पुणे विमानतळावर येणार्‍या या विमानांची आणि विमान प्रवाशांची कसून तपासणी केली जाते़ त्यातून आजवर अनेक तस्करीची घटना उघडकीस आल्या आहेत़ सोन्यावर रेडियम प्लेटिंग केले की स्कॅनिंगमध्ये आतील सोने दिसून येत नाही़ त्याच्यावर नंतर प्रक्रिया केल्यावर संपूर्णपणे सोने परत हाती लागते़ त्यामुळे तस्करी करताना वेगवेगळे माध्यम वापरण्यात येत आहे.