डाळींबाच्या पानाने त्वचा होते मुलायम

0

डाळींब या फळाचा अनेकविध उपयोग होत असतो. आरोग्यासाठी गुणकारी होण्याबरोबर त्वचेच्या सौंदर्यासाठी हे फळ रामबाण उपाय आहे. डाळींबाच्या नियमित सेवनाने सौंदर्य वाढते. या फळातील ग्रीन टी आणि संत्रे यांच्या तुलनेत तीन पटीने एन्टीऑक्सिडेंट वाढते. ज्याचा प्रत्यक्ष त्वचेवर परिणाम होतो. नव्या संशोधनामध्ये हे सिद्ध झाले आहे की, डाळींब हे फळच नव्हे, तर त्याच्या पानांचाही फायदा होतो. या पानांची पेस्ट लावल्याने त्वचा मलमलीत बनते. त्वचेेेचे रोगही दूर होतात. आजकाल दुषित आणि अनियमित जेवणाने लोकांना अनेक त्वचारोग जडतात. तसेच वयाच्या आधी सुरकत्या येतात. या पेस्ट लावूनही या सुरकत्याही कमी होतात.