27 हजारांची रोकड जप्त ; सहाय्यक अधीक्षकांच्या पथकाची कारवाई
भुसावळ– शहरातील टीव्ही टॉवरजवळ सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या पथकाने धाड टाकून पाच जुगार्यांना अटक केली. आरोपींकडून 18 हजार 70 रुपये रोख व सात हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले. अटकेतील आरोपींमध्ये विनोद गोविंदा कसबे (32, अण्णाभाऊसाठे नगर), शेख असलम शेख अलताफ (30, खडका रोड, मुस्लीम कॉलनी), प्रकाश शामलाल साधवानी (48, सिंधी कॉलनी, नानक नगर, छोटा हनुमानमंदिर), दीपक उखर्डू कोळी (32, गंगाराम प्लॉट), शुभम मोहन वारके (23, गंगाराम प्लॉट) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाय.एस.अहिरे, सहाय्यक फौजदार दिलीप कोळी, हवालदार प्रदीप पाटील, हवालदार छोटू वैद्य, हवालदार नंदलाल सोनवणे, संजय भदाणे, आरसीपीचे तुषार जोशी, दीपक ठाकूर, सचिन चौधरी, मंदार महाजन, विकास पवार, योगेश शिंदे आदींच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपींची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.