डाव उधळला : 7 जुगारी जाळ्यात

साकरी गावात तालुका पोलिसांच्या छाप्याने जुगार्‍यांच्या गोटात उडाली खळबळ

भुसावळ : तालुका पोलिस ठाणे हद्दीतील साकरी गावातील मराठी शाळेच्या  भिंतीला लागून जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकत सात जुगार्‍यांच्या मुसक्या आवळल्या. मंगळवारी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनपे जुगार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली. संशयीतांकडून रोकडसह वाहने मिळून 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या आरोपींना अटक
पोलिसांनी कैलास चंदु तायडे, अनिल रामदास भारंबे, विलास पिंताबर बोदर, नारायण झगु तायडे, सुपडु कौतीक घोडके, भरत तोताराम नेहते,  सदाशीव वसंत मोरे (सर्व रा.साकरी) यांना अटक करण्यात आली. संशयीत  मांग पत्यावर झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना आढळले. त्यांच्याकडून सहा हजार 650 रुपये व पत्ता जुगाराची साधने, ताब्यातील वाहनासह एकूण  61 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण, विठ्ठल फुसे, शामकुमार मोरे, प्रेमचंद सपकाळे, विशाल विचवे, होमगार्ड जगदीश पाटील आदींच्या पथकाने केली.