यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथे एका शेतमजुराने विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केली. भरत जनार्दन जंगले (45) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. जंगले यांनी डोंगरकठोरा शिवारातील विनोद मधुकर राणे यांच्या शेतातील विहिरीत 27 ते 28 एप्रिलच्या दरम्यान विहिरीत उडी घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई असा परीवार आहे. याबाबत शेतमालक विनोद मधुकर राणे यांनी यावल पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. भरत जंगले यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला, डॉ.प्रीतम तायडे यांनी केले.