विशेष मुलांना शिकवणार्या ‘त्या’ शिक्षकांचा केला सन्मान
लायन्स क्लब ऑफ पूना निगडीतर्फे राबविला उपक्रम
निगडी : सर्वसाधारण मुलांना शिकविणे कठीण नाही, पण विशेष मुलांना शिकविणे निश्चितच एक महान कर्म आहे. अशा विशेष मुलांना शिकविणार्या 12 विशेष शिक्षकांचा लायन्स क्लब ऑफ पूना निगडीचे उपप्रांतपाल एम.जे.एफ.ला ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते करण्यात आला. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. जागृती अंध मुलींची शाळा आळंदी, पताशाबाई अंध मुलांची शाळा भोसरी, कामायनी विद्या मंदीर निगडी, मूकबधिर विद्यालय चिंचवड, अपंग विद्यालय यमुनानगर, अभिनव विद्यालय जाधववाडी या शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ पूना निगडीचे अध्यक्ष जनार्दन गावडे होते. याप्रसंगी अशोक येवले व उषा येवले, दिलीपसिंह व मीना मोहिते, चंद्रशेखर व भाग्यश्री पवार, कुटे, संजय व सविता निंबाळकर, हरी नायर, जाधव, मारूती मुसमाडे, जयंत व जयश्री मांडे, प्रशांत व मंजिरी कुलकर्णी, नाणिक पंजाबी, सुदाम मोरे, राजू व जयश्री कोतवाल, अविनाश व गौरी चाळके, दत्ता तरटे आदी उपस्थित होते.
अनाथाश्रमातील मुलांना मदत
यावेळी उपप्रांतपाल पेठे व तेजस्विनी दहातोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीपसिंह व मीना मोहिते, चंद्रशेखर व भाग्यश्री पवार, कुटे, संजय व सविता निंबाळकर, उषा येवले यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन अशोक येवले यांनी केले. तसेच लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्यावतीने मळवली येथील अनाथ आश्रमातील अनाथ मुलांसाठी सुदाम मोरे यांनी 35 हजार रूपयांचे किराणा साहित्य, स्टेशनरी वस्तू दिल्या. मोरे गेल्या 6 वर्षांपासून अनाथ आश्रमासाठी मदत करतात. आंबेगाव येथील डिंभे आरोग्य केंद्र येथे आदिवासी, वनवासी व गरीब कुटुंबातील कुपोषित बालकांसाठी लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्यावतीने बालकांना सकस आहाराची 70 पाकिटे आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे यांच्याकडे अध्यक्ष जनार्दन गावडे यांनी सुपूर्त केली.
सॅनिटरी नॅपकीनचे वाटप
चर्होली येथील जगदीशचंद्र महिंद्रा माध्यमिक विद्यालयातील मुलींना लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या महिला सदस्य उषा येवले, सविता निंबाळकर व जयश्री मांडे यांनी सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. शाळेचे मुख्याधापक विजय हगवणे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शिक्षिका निशीगंधा याही उपस्थित होत्या.