जळगाव । जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ‘डिजिटल अभ्यासक्रम’ तयार करण्याचे निश्चित केलेले आहे. 21 जून रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेत याविषयी रूपरेषा निश्चित करण्यात आली. याच उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव तालुका शिक्षण विभागाने डिजिटल अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा आयोजित केलेली होती व कार्यशाळा उत्साहात झाली. गटसाधन केंद्र जळगाव येथे आयोजित कार्यशाळेत तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण अध्यक्षस्थानी होत्या. कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी फिरोज पठाण उपस्थित होते.
अभ्यासक्रमाबाबत केले मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल सरोदे, विजया चौधरी, दिपक भारंबे, विवेक नेहते, दिपनंदा पाईल, सचिन महाजन, स्वाती पगारे, निखिल नेहते, सारीका सरोदे, विजय नारखेडे, दिपाली पाटील, उत्कर्षा सोनवणे, प्रशांत भारंबे, भुषण भोळे आदींनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुपमा कोल्हे यांनी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी फिरोज पठाण उपस्थित होते.