‘डिजीटल हँण्डराईटींग अ‍ॅण्ड ड्रॉइंग अ‍ॅनालिसीस’ अ‍ॅपचे लोकार्पण

0

अमळनेर । आजचे युग डिजीटल युग म्हणून ओळखल जात. डिजीटल क्रांतीचे महत्व ओळखूनच शहरातील वेदांशू बिझनोफेअर्स प्रा.लि. या संस्थेचा संस्थापक वेदांशू पाटील या तरुणाने ‘डिजीटल हँण्डराईटींग अ‍ॅण्ड ड्रॉइंग नालिसीस’ अ‍ॅप लॉन्च केले. वेदांशू हा जिल्हा बँकेच्या संचालक तिलोत्तमा पाटील यांचा मूलगा असून त्याने सिंगापूर मधून एमबीए केल्यानंतर आंतरराष्ट्रीय हस्ताक्षरविज्ञान संस्थेतून हस्ताक्षरविज्ञानाचे प्रमाणपत्र संपादन केल आहे. बुधवार 7 जून रोजी नाशिक येथे विश्वास को-ऑपरेशन बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्याहस्ते हे अ‍ॅप लॉन्च करण्यात आले.

याप्रसंगी इंजिनिअर स्पार्कचे टेक्नॉलॉजीचे संचालक विक्रम बोडके, प्रणव राजपूत उपस्थित होते. या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे घरी बसल्या आपण चित्रकला अथवा सहीद्वारे आपला स्वभाव जाणून घेऊ शकतो. मानवी स्वभावविशेष समजावून घेण्याच उत्तम माध्यम असलेल हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून या अ‍ॅपवर आपले हस्ताक्षर अथवा चित्र स्कॅन करुन अपलोड केल की त्याच विश्लेषण करुन घरीबसल्या मिळेल. डिजीटल इंडिया अंतर्गत सुरु केलेल्या या संस्थेने टाकलेल हे पहिल पाऊल आहे. आगामी दोन प्रोजेक्टवर या संस्थेच काम सुरु असून निर्मीतीशील डिजीटल व्यवसाय देण्याचा संस्थेचा मानस आहे. भारताततील तरुण परदेशात जाण्यासाठी उत्सुक असताना. परदेशातून उच्चशिक्षण घेतलेला एक तरुण परदेशाचा मोह सोडतो आणि बेरोजगारीची समस्या भेडसावत असताना आपल्या महत्वाकांक्षेतून स्वबळावर आपला व्यवसाय उभारतो ही बाब आजच्या तरुणाईला निश्चितच प्रेरणा देणारी आहे.