भुसावळ । येत्या लग्नसराईसह विविध जयंती उत्सवात डिजेचा वापर न करता पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्यात यावे तसेच डिजेचा अतिरेक करुन आवाजाची मर्यादा ओलांडल्यास संबंधित डिजे चालकावर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिला. येथील बाजारपेठ पोलीस स्थानकात दुपारी बाजारपेठ हद्दीतील डिजे चालकांची बैठक घेण्यात येऊन त्यांना आवश्यक त्या सुचना पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या.
ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न करा
यावेळी पोलीस निरीक्षक सरोदे यांनी शहरातील सर्व डिजे चालकांना बोलावून त्यांना वाढते ध्वनी प्रदुषण हे नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक असून ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच 55 डिसेबल पर्यंत आवाजाची मर्यादा ओलांडता कामा नये अशा सुचना केल्या.