जळगाव : तालुक्यातील कडगाव शिवारात पोकलँड मशीनमधून डिझेल चोरी करताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले. हा प्रकार गुरुवार, 10 मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. मोहम्मद हसनैन नुरमोहम्मद असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
डिझेल चोरताना रंगेहाथ अटक
जळगाव तालुक्यातील कडगाव शिवारात लिफ्ट एरीगेशन स्कीमच्या पंप हाऊसचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी पोकलंडचा वापर करण्यात येत असून या पोकलँडवर मोहम्मद हसनैन नुरमोहम्मद हा चालक म्हणून कामाला आहे. गुरुवार, 10 मार्च रोजी सकाळी मोहम्मद हा पोकलेनच्या टाकीमधून 26 लिटर (दोन हजार 470 रुपये किमतीचे) डिझेल चोरी करताना रंगेहाथ सापडला. बांधकामावरील सिव्हिल इंजिनिअर विवेक मधुकर बेदरकर (42) याच्या फिर्यादीवरुन चालक मोहम्मद हसनैन नुरमोहम्मद (रा.ताजपूर सारण, थाना जनता बाजार, जि.छपरा, बिहार, हल्ली मुक्काम कडगाव, ता.जि.जळगाव) याच्याविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार अलियार खान करीत आहेत.