डिपीवरील शॉटसर्कीटमुळे विद्युत उपकरणांचे नुकसान

0

वरणगाव । शहरातील रामपेठ भागात इलेक्ट्रीक डिपीवर शॉटसर्कीट झाल्याने परिसरातील रहिवाशांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे टिव्ही, फ्रिज, मिक्सर, कुलर, पंखे आदी वस्तू जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना मंगळवार 27 रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान घडल्याने या भागात रात्रीपर्यंत विजपुरवठा बंद होता.

नुकसान भरपाईची नागरिकांची मागणी
शहरातील राम पेठ भागातील इलेक्ट्रीक डिपीवर एका प्रवाहावर दुसरा प्रवाह आल्याने शॉटसर्कीट होवून डिपीचा स्फोट झाला. राम पेठ, कवाडे नगर, मरीमाता परिसरातील रहिवाशांचे घरातील विद्युत साहित्य टिव्ही, फ्रिज, कुलर, पंखे, मिक्सर आदी उपकरणे जळाले. पावसाळ्याचे दिवस असल्याने या भागातील रहिवाशांना रात्रभर अंधार्‍यात डांसाशी सामना करावा लागला. यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्यामुळे विज वितरण कंपनीने ग्राहकांचे झालेले नकसानीची भरपाई मिळण्याची मागणी या भागातील रहिवाशी राहुल चव्हाण, जयेश जगदाळे यांच्यासह नागरीकांनी केली आहे.