डिप्लोमा परीक्षेत रायसोनीच्या विद्यार्थ्यांचे यश

0

जळगाव । येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेकंडशिप डिप्लोमाचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. सेकंडशिप डिप्लोमा मधील मेकेनिकल व सिव्हील विभागातील सागर वालेचा, कौस्तुभ देवपुरा, हर्षल पाटील, मयूर रामचंदानी व प्रियांका धिंगवाणी यांच्या चांगले गुण मिळाले असून या विद्यार्थ्यानी ’डिझाईन ऑफ आरसीसी स्टक्चर‘ या विषयात मिळविले आहेत. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे.

उर्वरित विद्यार्थ्यांची टक्केवारी याप्रमाणे
तसेच सिव्हील द्वितीय वर्ष पवन वाधवा 88 टक्के, प्रणीत जगताप 84 टक्के तृतीय वर्ष- सागर वालेचा 89 टक्के, मयूर रामचंदानी 88 टक्के, मेकेनिकल द्वितीय वर्ष- निखील सोनवणे 80 टक्के, हर्षल सोनार 77 टक्के विशाल कटारिया 75 टक्के, तृतीय वर्ष – श्रीकांत गर्गे 86.88 टक्के व मनीष शर्मा 81 टक्के गुण या विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, विभागप्रमुख प्रा.विजय बोरसे व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.