धुळे : दुचाकीवरील प्रवास महिलेसाठी अखेरचा ठरला. कापडण्यातील महिला घराकडे जाण्यासाठी रस्त्यावर उभी असताना परीचीताचे वाहन दिसल्याने त्यावरून घराकडे निघाली असताना दुभाजकावर वाहन आदळल्याने महिला जखमी होवून मयत झाली. या प्रकरणी देवपूर पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा रवींद्र गांगुर्डे (35, कापडणे) असे मयत महिलेचे नाव आहे.
दुचाकीवरून प्रवास अखेरचा
मनीषा गांगुर्डे या कामानिमित्ताने धुळे शहरात आल्या होत्या. सायंकाळी घरी जाण्यासाठी त्या चाळीसगाव चौफुलीजवळ उभ्या होत्या. याचवेळी घराशेजारी राहणारा शुभम संतोष पाटील हा दुचाकीने (एम.एच.19 बी.क्यू.6098) जात होता. त्याच्या वाहनावरुन मनीषा गांगुर्डे यांचा प्रवास सुरू झाला. देवपुरातून जात असतांना दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात मनीषा गांगुर्डे या ठार झाल्यात. घटनेबद्दल देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कर्मचारी एस.बी.चिंचोलिकर घटनेचा तपास करत आहे.