डिसेंबरनंतर सर्व एटीएमकार्ड बंद होणार

0

नवी दिल्ली : लवकरच आपले एटीएम कार्ड बंद होणार आहे. चुंबकीय पट्टी असणारे कार्ड बंद होणार आहे. त्यामुळे आपले एटीएम कार्ड लवकरच कालबाह्य होणार आहे. चुंबकीय पट्टी असलेली सर्व कार्ड बँक बंद करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याबदल्यात चिप कार्ड वापरण्यासाठी प्रस्ताव आहे. हे बदल आरबीआयच्या आदेशानुसार केले जात आहे. त्यासाठी डिसेंबर २०१८ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

आरबीआयने ग्राहकांचे एटीएम-डेबिट आणि क्रेडिट कार्ड तपशील सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. आरबीआयच्या मते, चुंबकीय पट्टी कार्ड आता जुने तंत्रज्ञान आहे. असे कार्ड देखील बंद केले पाहिजे. वास्तविक, हे कार्ड पूर्णपणे सुरक्षित नव्हते म्हणूनच ते बंद करण्यात येत आहे. त्याच्या जागी ईएमव्ही चिप कार्ड तयार करण्यात आले आहे. सर्व जुने कार्ड नव्या चिप कार्डात बदलले जाणार आहे.

जुने कार्ड बदलून देणार
आरबीआय २०१६ मध्ये याबाबत आदेश दिले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बॅंकांना ग्राहकांच्या सोप्या चुंबकीय स्ट्रीप कार्डे बदलण्याची सूचना केली होती. आता डिसेंबर २०१८ ची मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता बँका केवळ चिप-एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड देत आहेत. तसेच ग्राहकांना जुने कार्ड बदलून देत आहेत. नवी कार्ड घेण्यासाठी कोणती शुल्क आकारले जाणार नाही. एसबीआय आपल्या ग्राहकांचे कार्ड बदलून देत आहे. त्यामुळे चुंबकीय स्ट्रीप कार्ड बंद करणार आहे. त्याबाबत बॅंकने नोटिफिकेशन जारीहीकेलेय. त्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. हे कार्ड दिलेल्या मुदतीनंतर चालणार नाही. मुदतीपर्यंत हे कार्ड ब्लॉक केले जाणार नाही.