मुंबई । प्रवाशांचा प्रवास गारेगार करणारी एकच एसी लोकल सध्या पश्चिम रेल्वेवर मार्गावर धावत आहे. पण, अजूनही या एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तरीही, या लोकलच्या फेर्या वाढवण्यासंबंधी प्रवाशांकडून सातत्याने सूचना केल्या जात आहेत. त्यानुसार, रेल्वे प्रशासन दुसरी एसी लोकल ट्रॅकवर उतरवण्याचा विचार करत असून ही लोकल डिसेंबरपर्यंत पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात येईल, अशी अपेक्षा आहे. चबोगीची बांधणी सुरू झाली असून, आगामी एसी लोकलची चेन्नई (आयसीएफ) मधील फॅक्टरीमध्ये बांधणी होणार आहे.
अडीच हजार बोगीच्या निर्मितीचे लक्ष्य
31 मार्चपर्यंत 2 हजार 500 बोगीची निर्मिती करण्याचं लक्ष्य निश्चित केले असून जर्मन तंत्रज्ञानाच्या एलएचबी बोगीची निर्मिती सुरू करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. पश्चिम रेल्वेवर पहिली एसी लोकल नाताळच्या मुहूर्तावर धावली. यानंतर या लोकलचा विस्तार विरारपर्यंत करण्यात आला आहे. पण, अजूनही या एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पुढच्या वर्षात नवीन लोकल रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच एसी लोकल बांधणीच्या ऑर्डर आयसीएफला दिल्या आहेत. त्यामुळेच, डिसेंबरमध्ये दुसरी एसी लोकल येणं अपेक्षित आहे.