‘डिस्ने कार्टून’ला आवाज देणाऱ्या आता दिसणार हिरॉईनच्या रूपात

0

डिस्ने कार्टून’ला आवाज देणाऱ्या महिला व्हॉईस ओव्हर कलाकार प्रथमच जगासमोर आल्या. त्यांच्या घरच्यांनाही आजवर नसलेली ‘डिस्ने प्रिन्सेस’चे सीक्रेट जगासमोर खुले झाले. पाईगे ओ हारा (ब्युटी अँड बिस्टममधील बेले), आयरिन बेडार्ड (पोकाहांटस), मँडी मूर (टँगलमधील रापुन्झेल), ऑलि क्राव्हालो (मोअना), सारा सिल्व्हरमॅन (रेक इट राल्फमधील वॅनेलोप श्वित्झ), क्रिस्टेन बेल (फ्रोझनमधील एना), केली मॅकडोनाल्ड (ब्रेव्ह मधली मेरीडा), अनिका रोझ (द प्रिन्सेस अँड फ्रॉगमधील तिएना), लिंडा लार्किन (अल्लादिन मधील लार्किन) आणि जोडी बेन्सन (द लिटल मेर्मेड मधील एरिएल) या सर्व नुकत्याच एकत्र आल्या होत्या. रेक इट राल्फ २ हा चित्रपट पुढील वर्षी रिलिज होणार आहे. त्यात या डिस्ने हिरॉइन वेगळ्या प्रतिमेत, हिरॉईनच्या रूपात दिसणार आहेत. ड्रेकऐवजी त्या टीशर्ट घातलेल्या दिसणार आहेत.

स्नो व्हाईट आणि सिंड्रेला उपस्थित नव्हत्या तरी डिस्नेच्या मते हे मोठे स्नेहसंमेलन होते. नव्या फिल्ममध्ये डिस्ने या हिरॉइन्सना रोल देणार आहे. हा रोल त्यांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देणार आहे.