डीआरएसमध्ये बिघाड, पहिल्यांदाच घडला क्रिकेटच्या इतिहासात…

0

धर्मशाला । भारत व कांगारू यांच्यातील कसोटी मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवित कांगारूंना लोळवले.चौथा सामना दोन्ही संघासाठी करो या मरो असा होता. जो संघ धर्मशाळा येथील कसोटी जिकले तो मालिकेवर विजय मिळविले. त्यामुळे या सामन्यातील प्रत्येक रन आणि विकेट दोन्ही संघांसाठी प्रचंड महत्वाचे होते. धर्मशाला कसोटीच्या तिसर्‍या दिवशी कमिन्सच्या पहिल्या चेंडूवर जाडेजाला मैदानावरील पंचांनी बाद ठरवले. पण यावेळी भारताच्या मदतीला डीआरएस धावून आले. त्या महत्वाच्या क्षणी डीआरएसनं जाडेजाला नाबाद ठरवले. चौथ्या दिवशी एक अशी वेळ आली की, पंचांनी खेळाडूंना सांगितलं की, तांत्रिक कारणांमुळे (वीजेच्या कमतरतेमुळे) काही वेळासाठी डीआरएस काम करेनासे झाले आहे. दिवसाच्या तिसर्‍या षटकातच पंचांनी खेळाडूंना सांगितले की, तांत्रिक बिघाडामुळे चेंडू ट्रॅक करु शकत नाही. फक्त स्निको मीटर सुरु आहे.दरम्यान, सामन्यातील त्या वेळेत दोन्ही संघातील कुणालाही डीआरएसची गरज पडली नाही. काही वेळानंतर डीआरएस यंत्रणा पूर्ववत झाली.